अखेर ठरलं ! कांदा अनुदान ‘या’ दिवशी मिळणार; नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी पूर्ण, पण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडले आहेत. नैसर्गिक आपत्यांमुळे उत्पादकता कमी झाली आहे. शिवाय कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी सुरुवातीलाही जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कांद्याला खूपच कमी दर मिळत होता.

कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक चांगलेच आक्रमक बनले होते. तसेच अनेक शेतकरी संघटनांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला.

राज्यातील कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल एवढ अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादित देण्याचे जाहीर केले. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळेल असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीमध्ये अर्ज करण्यास सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. यामुळे कांदा उत्पादक अनुदान केव्हा मिळणार हा प्रश्न सध्या उपस्थित करत आहेत.

तर पुन्हा एकदा सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण सरकारी कामासंदर्भात तंतोतंत खरी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरंतर, सध्या कांदा अनुदानासाठी सादर झालेल्या प्रस्तावाची पडताळणी केली जात आहे. जेव्हा शासनाने कांदा अनुदानाचा निर्णय जाहीर केला तेव्हापासून 31 मार्चपर्यंत राज्यातील बहुतांशी बाजारपेठेत कांद्याची विक्रमीं आवक झाली होती.

प्रामुख्याने अहमदनगर, नासिक आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजार समित्यामधील आवक संशयास्पद आहेत. यामुळे पणन विभागाने सर्व बाजार समित्यांमध्ये सादर झालेल्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सध्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. यात पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

मात्र सोलापूर जिल्ह्यातील कांदा अनुदानासाठी सादर झालेल्या अर्जांची पडताळणी अद्याप बाकी आहे. दरम्यान, याबाबत देखील एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलै 2023 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कांदा अनुदानासाठी सादर झालेल्या अर्जांची देखील पडताळणी पूर्ण होणार आहे.

अर्थातच येत्या सोमवार पर्यंत अनुदानासाठी सादर झालेल्या अर्जाची पडताळणी पूर्ण होणार आहे. यामुळे लवकरच शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळेल असे चित्र तयार होत आहे. कांदा अनुदान केव्हा मिळणार याबाबत शासनाकडून कोणतीच अधिकारिक माहिती देण्यात आलेली नाही. पण आता पडताळणीचे काम  सोमवारी पूर्ण होणार असल्याने लवकरच कांदा अनुदान देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Leave a Comment