जुलैमध्ये पावसाचा खंड पडणार की नाही ? पंजाब डख यांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यातील 23 तारखेपासून पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय आला आहे. काही दिवसांच्या खंडानंतर पावसाने आता जोर पकडला आहे. राज्यातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागात अजूनही पावसाची रीपरीप सुरु आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा वगळला तर मात्र उर्वरित राज्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. राज्यातील शेतकरी अजूनही जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी आठवडाभर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

याशिवाय ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी देखील पावसा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी जुलै महिन्यात पावसाचा खंड राहणार असा अंदाज समोर आला होता. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत जुलै महिन्यात खरंच पावसाचा खंड राहणार का याबाबत पंजाब डख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

डख यांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात पावसाचा खंड राहणार नाही. जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दोन जुलैपासून ते आठ जुलै पर्यंत राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही भाग बदलत पाऊस पडणार आहे.

जवळपास 15 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस पडेल आणि बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. चक्रीवादळ आल्यानंतर मान्सूनचा प्रवास विस्कळीत झाला होता. मात्र आता मान्सून पूर्व पदावर आला असून जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

निश्चितच जुलै महिन्यात चांगला पाऊस राहणार असल्याने ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत त्या भागातील पिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच पावसामुळे ज्या भागात अद्याप खरीप हंगामातील पेरण्या झाल्या नसतील तेथे पेरण्या पूर्ण होतील असा आशावाद व्यक्त होत आहे.

कोणत्या भागात पडणार पाऊस

पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आज एक जुलै रोजी राज्यातील कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणेसह सर्वच जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. दोन जुलै ते 10 जुलै पर्यंत सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

जुलैचा पहिला आणि दुसरा आठवडा राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. पावसाचा खंड राहणार नाही. दोन जुलै ते आठ जुलै पर्यंत पूर्व, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार असून सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे त्यांनी नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आठ ते दहा जुलै पर्यंत पेरण्या पूर्ण होणार नाहीत त्यांच्या पेरण्या 15 जुलै पर्यंत पूर्ण होतील असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Comment