State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करणे सोबतच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत मागणी केली जात आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा देखील केला आहे. शासनाला या संदर्भात वारंवार निवेदने सादर झाली आहेत. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होणार असे चित्र तयार झाले आहे.
खरे तर आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. सोबतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील राहणार आहेत.
अशा परिस्थितीत, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्यासाठी वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत असेच विधान केले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले होते.
खरंतर सध्या स्थितीला महाराष्ट्र राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष एवढे आहे.
मात्र ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणि देशातील अन्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे एवढेच आहे.
यामुळे राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 60 वर्षे एवढे केले गेले पाहिजे अशी मागणी आहे.
दरम्यान याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर सकारात्मक निर्णय होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.