राज्य सरकारी कर्मचारी झालेत मालामाल ! ‘या’ भत्त्यात झाली वाढ, वित्त विभागाचा जीआर जारी, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे काल अर्थातच सात ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा जीआर निघाला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयअंतर्गत राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ झाली आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या वाहन चालकांच्या संदर्भात आहे. या शासन निर्णया अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वाहनचालकांना दिल्या जाणाऱ्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासकीय सेवेतील वाहन चालकांच्या माध्यमातून केली जाणारी मागणी पूर्ण झाल्याचे चित्र आहे. आता या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील वाहन चालकांनी नऊ तास 45 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास शंभर रुपये प्रति तास याप्रमाणे अतिकालिक भत्ता मिळणार आहे.

सदर शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांनी कामाच्या दिवशी नऊ तास 45 मिनिटांपेक्षा (भोजनाचा वेळ धरून) जास्त काम केल्यास आणि रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी देखील काम केल्यास प्रति तास शंभर रुपये प्रमाणे अतिकालिक भत्ता मिळणार आहे.

विशेष म्हणजे सदर शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार जर राज्य कर्मचाऱ्यांनी अर्धा तास किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्यास तो एक तास म्हणून गृहीत धरला जाणार आहे.

मात्र या संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारा हा अतिकालिक भत्ता त्यांच्या पगाराच्या 30% पेक्षा अधिक राहता कामा नये, अशी महत्त्वाची तरतूद या जीआर मध्ये शासनाने करून दिली आहे. राज्य शासनाने घेतलेला हा महत्वाचा निर्णय शासन निर्णय अर्थातच जीआर निर्गमित झाल्याच्या दिवसापासून लागू राहणार असल्याचे देखील यामध्ये उल्लेखित करण्यात आले आहे.

निश्चितच, राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून जाहीर झालेला हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरणार असून त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळणार असल्याचे मत जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले जात असून विविध कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Leave a Comment