राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठी भेट मिळणार ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर, सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण देशात मतदानाची प्रक्रिया सुरू असून मतदान पूर्ण झाल्यानंतर येत्या 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.

राज्य कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक प्रलंबित मागणी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे सरकारकडून पूर्ण केली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य सरकार विधानसभा निवडणुकांआधीच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवू शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे एवढे आहे. तसेच ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे एवढे आहे.

दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तथा देशातील 25 राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील आणखी दोन वर्षांनी वाढवले गेले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वय वाढवण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर सध्या राज्यात विविध विभागात हजारो पदे रिक्त आहेत.

ही पदे एकाच वेळी भरता येणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत, जर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले तर आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांची संख्या नियंत्रणात ठेवता येणे शक्य होणार आहे.

दुसरीकडे जर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेले तर राज्य कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही गोष्टी पाहता राज्य शासन सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात सकारात्मक आहे.

वर्तमान शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकांपूर्वी घेऊ शकते असे म्हटले जात आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होऊ लागला आहे. तथापि, सरकार खरंच या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

Leave a Comment