State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
खरंतर, केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. यासोबतच देशातील जवळपास 25 घटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. मात्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गेली कित्येक वर्ष कर्मचाऱ्यांकडून लढा दिला जात आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून विविध संघटनांनी शासनादरबारी यासाठी निवेदने दिली आहेत.
काही लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये याबाबत शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकां पाहता यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशातच या मुद्द्याबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य शासन दरबारी खरच या मुद्द्यावर विचार केला जात आहे का ? याबाबत माहिती हाती आली आहे.
राज्याचे नवोदित उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. या मुद्द्यावर विधान परिषदेत विलास पोतणीस आणि सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या तारांकित प्रश्नात विधान परिषदेचे सदस्य शिंदे आणि पोतनीस यांनी मे महिन्यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत लिखित निवेदन दिले आहे का ? आणि हो तर मग यावर राज्य शासनाकडून काय निर्णय घेण्यात आला आहे याबाबत विचारणा केली होती.
यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत लेखी निवेदन देण्यात आले असल्याचे सांगितले आहे. मात्र, या मागणीवर अद्याप शासन स्तरावर कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.