State Employee News : राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार पुन्हा एकदा गोत्यात येणार असे चित्र आहे. कारण की राज्यातील काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संपाच हत्यार उपसणार आहेत. विशेष म्हणजे एसटी कर्मचारी हा संप गणेशोत्सवाच्या काळात करणार आहेत. यामुळे भाविकांच्या गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरला संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी जर शासनाचे आमचे म्हणणे ऐकले नाही आणि प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यासह प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार असा इशाराही दिला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एसटी कामगार संघटनेच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत संपाबाबतचा हा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सण आहे, यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक एसटीने प्रवास करणार आहेत.
अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला असल्याने यामुळे पुढल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो असे सांगितले जात आहे.
खरंतर एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी केलेल्या संपात महामंडळाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला असल्याने पुन्हा एकदा एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे हा संप शिंदे फडणवीस सरकार साठी देखील डोकेदुखी सिद्ध होणार आहे. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शिंदे फडणवीस सरकार लवकरात लवकर सोडवते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय ?
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता लगेच लागू करणे.
- महागाई भत्ता थकबाकी, तसेच घरभाडे भत्ता आणि पगारवाढी मधील फरक तत्काळ अदा करणे.
- वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे घोषित पाच हजार, चार हजार आणि दोन हजाराचे वेतन काढून घ्यावे.
- शिल्लक रकमेचे वाटप लवकरात लवकर व्हावे.
- दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू व्हावा.
- एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये विद्यमान कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांना पास मिळावा.