State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे. राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय हे 58 वर्षे एवढे आहे.
दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर देशातील इतर 25 घटक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील 60 वर्षे एवढे झाले आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील आणखी दोन वर्षांनी वाढवले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, अशातच शिंदे सरकारने राज्यातील कृषी विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे वय 62 वर्षांवरून 60 वर्षे एवढे करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे अ, ब आणि क संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय वाढणार की नाही हा मोठा सवाल उपस्थित होत होता. अशातच, आता राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री महोदय यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिन समारंभात हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री महोदय यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय होणार असे म्हटले होते.
तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याबाबत अर्थातच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात बैठक घेण्यास राज्याच्या मुख्य सचिवांना सांगितले जाईल असे आश्वासन दिले आहे.
एकंदरीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष व्हावे यासाठी वर्तमान शिंदे सरकार सकारात्मक आहे. मात्र याबाबत सकारात्मक निर्णय केव्हा होईल आणि राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केव्हा होईल हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.