State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे.
हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युईटीच्या संदर्भातला आहे. माननीय हायकोर्टाने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना देखील पेन्शनचा आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा यावेळी दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील मुख्यलिपीक, परिचारिका, सहाय्यक पंचकर्म, सहयोगी प्राध्यापक, शिपाई वाचक म्हणून सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ नाकारला होता.
सदर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळू शकत नाही असे शासनाचे म्हणणे होते. यामुळे या सदर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली.
दरम्यान याच याचिकेवर माननीय न्यायालयाने सुनावणी घेतली असून या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकाकर्त्यांनी पात्रता सेवा पूर्ण केल्यानंतरच स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याचे म्हटले होते.
यामुळे ते सदर सेवा निवृत्त कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅच्युईटीच्या लाभासाठी पात्र असल्याचे वकिलांनी म्हटले. दरम्यान हाच युक्तिवाद माननीय न्यायालयाने ग्राह्य धरला आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
यावेळी माननीय न्यायालयाने सदर स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅच्युएटीच्या लाभासाठी पात्र असल्याचे सांगत सरकारच्या त्या मनमानी आदेशाला रद्द करण्याचा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना देखील इतर निवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनचा आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकणार आहे.
यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर या सदर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधानाचे भाव पाहायला मिळाले आहेत.