State Employee News : महाराष्ट्रातील लाखो राज्य कर्मचाऱ्यांसहित सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशात राममय वातावरण पाहायला मिळत आहे.
रामभक्तीमध्ये संपूर्ण देश तल्लीन झाला आहे. कारण की पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीराम अयोध्या येथील भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत. राम भक्तांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहेत.
22 जानेवारीला आयोध्या येथील भव्य दिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि हे मंदिर राष्ट्राला समर्पित केले जाणार आहे.
यामुळे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने आज 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
खरे तर अनेकांच्या माध्यमातून या दिवशी महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली होती. यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.
दरम्यान आज शिंदे सरकारने ही मागणी मान्य करत 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं, शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती केली होती.
अनेकांनी 22 जानेवारीला रामभक्त रस्त्यावर उतरतील आणि यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येईल, वाहतूक कोंडीची समस्या भेड जाऊ शकते परिणामी या दिवशी सुट्टीत जाहीर केली पाहिजे असे म्हटले होते.
याच साऱ्या गोष्टींचा शिंदे सरकारने सारासार विचार केला असून अखेर कार 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
22 जानेवारीला महाराष्ट्रात पब्लिक हॉलिडे राहणार असल्याने आता रामा भक्तांना प्रभू श्रीरामांच्या नगरीत अर्थातच अयोध्येत होणारा भव्य सोहळा पाहता येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाने देखील या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश मध्ये देखील या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.