State Employee News : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सध्या महाराष्ट्रातील विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विरोधक शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक बनले आहेत. राज्य शासनाकडून देखील शेतकरी आणि कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत.
दरम्यान, आज विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी सेवकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कृषी सेवक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शासनाने 2004 मध्ये कृषी सेवक या पदाची निर्मिती केली आहे.
ज्यावेळी कृषी सेवक हे पद तयार करण्यात आले त्यावेळी कृषी सेवकांना 2400 रुपये एवढे मानधन दिले जात होते. त्यानंतर 2012 मध्ये कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. 2012 मध्ये कृषी सेवकांचे मानधन सहा हजार रुपये एवढे करण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत कृषी सेवकांना सहा हजार रुपये एवढ्या तूटपुंज्या मानधन मध्येच काम करावे लागत आहे.
जवळपास 11 ते 12 वर्षांचा काळ उलटला आहे तरी देखील कृषी सेवकांचे मानधन जैसे थे च आहे. या वाढत्या महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंजी मानधनात कसं जगायचं हा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती. यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता.
अनेक संघटनांनी कृषी सेवकांची ही मागणी शासन दरबारी मांडली. दरम्यान आता शासनाने याबाबत सकारात्मक असा निर्णय घेतला असून कृषी सेवकांच्या मानधनात तब्बल 12 वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता कृषी सेवकांना सोळा हजार रुपये प्रति महिना एवढ मानधन दिले जाणार आहे. निश्चितच शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय कृषि सेवकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.