State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर केंद्र शासनाने मार्च महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयाअन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवण्यात आला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा करण्यात आला. याआधी तो 38 टक्के एवढा होता. म्हणजेच यामध्ये चार टक्क्याची वाढ केंद्र शासनाने केली. केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने देखील याबाबत निर्णय घेतला आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 42 टक्के एवढा करण्यात आला.
यानंतर आता पुन्हा एकदा जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबतचा निर्णय या चालू महिन्यात केव्हाही घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. या चालू महिन्याच्या कोणत्याही एका मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
तसेच केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासन देखील लवकरच महागाई भत्ता बाबत निर्णय घेईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू केली जाईल असे सांगितले जात आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासून तीन टक्के डीए वाढणार आहे.
निश्चितच जर या चालू महिन्यात याबाबत निर्णय झाला तर या नोकरदार लोकांना सणासुदिच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळू शकतो. यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतही शासन दरबारी विचार सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे म्हणजेच रिटायरमेंट चे वय 58 वर्षे एवढे आहे. परंतु यामध्ये लवकरच दोन वर्षांची वाढ होईल आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
विशेष बाब अशी की, एका मीडिया रिपोर्टमध्ये याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असून लवकरच यावर निर्णय होणार असे सांगितले जात आहे. या प्रस्तावावर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार अशी माहिती देखील या निमित्ताने पुढे आली आहे.