फळबाग आणि शेतीकामांसाठी कोणते ट्रॅक्टर ठरणार फायद्याचे ? देशातील टॉप 5 मिनी ट्रॅक्टरची यादी पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mini Tractor News : अलीकडे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठा वाढला आहे. यंत्रविना शेती म्हणजे अशक्य बाब आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढण्याचे अनेक कारणे आहेत. यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण आहे मजूर टंचाई. मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव आता मजुरांऐवजी यंत्राच्या साह्याने अधिकाअधिक कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याशिवाय यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे केली तर जलद गतीने कामे होतात यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. शिवाय यंत्राच्या साह्याने कमी खर्चात शेतीची कामे केली जात आहेत. यामुळे पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी असायची त्या शेतकऱ्याकडे आता ट्रॅक्टर पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दरम्यान जर तुम्हीही ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल विशेषता तुमच्या फळबागेच्या कामासाठी तसेच इतर शेतीच्या कामासाठी मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण आज आपण देशातील टॉप पाच मिनी ट्रॅक्टरची माहिती जाणून घेण्याचा अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण ज्या मिनी ट्रॅक्टर बाबत जाणून घेणार आहोत त्यांच्या किमती पाच लाखाच्या आसपासच राहणार आहेत.

महिंद्रा Oja 2121 : महिंद्रा ही देशातील एक प्रमुख ट्रॅक्टर निर्माती कंपनी आहे. हा ट्रॅक्टरचा ब्रँड आपल्या महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी महिंद्रा चे ट्रॅक्टर वापरतात. महिंद्रा कंपनीचा ओझा 2121 हा अलीकडेच लॉन्च झालेला एक शक्तिशाली मिनी ट्रॅक्टर आहे.

इतर अन्य मिनी ट्रॅक्टर प्रमाणेच या मिनी ट्रॅक्टरला फोर व्हील ड्राईव्ह देण्यात आले आहे. यामुळे बाग कामांसाठी हा ट्रॅक्टर फायद्याचा ठरणार आहे. चिखलात फसला तरी देखील ट्रॅक्टर सहज निघणार आहे. या ट्रॅक्टरमध्ये 3 सिलेंडर्ससह 21 HP इंजिन देण्यात आले आहे, ज्यामुळे त्याचे मायलेज खूप चांगले आहे. यामुळे कमी डिझेलमध्ये शेतीची कामे होणार आहेत. साहजिकच यामुळे उत्पादन खर्चात बचत होणार आहे.

ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गीअर्स देण्यात आली आहेत. तसेच ऑइल इमर्स्ड ब्रेक देण्यात आले आहेत. यामुळे या ट्रॅक्टरची ब्रेकिंग सिस्टम चांगली असल्याचा दावा कंपनी करते. हा एक इंधन कार्यक्षम ट्रॅक्टर आहे. म्हणजेच कमी इंधनात जास्त काम या ट्रॅक्टरने करणे शक्य आहे. पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्रॅक्टर चालवायला देखील छान राहणार आहे.

सोनालिका एमएम 18 : महिंद्रा प्रमाणेच सोनालीका ही कंपनी देखील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय कंपनी आहे. पूर्वी या कंपनीचा महाराष्ट्रात मोठा बोलबाला होता. अजूनही राज्यात या कंपनीचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. शेतकरी बांधव तसेच व्यावसायिक या ट्रॅक्टरचा वापर प्रामुख्याने करतात.

जर आपणास सोनालिका चे मिनी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर आपल्यासाठी सोनालीका कंपनीचा MM 18 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. नावावरून लक्षात आलंच असेल की या ट्रॅक्टरमध्ये 18HP च इंजिन आहे. 18 HP सह 863.5CC च इंजिन पुरवण्यात आले आहे.

हे सिंगल सिलेंडर आणि वॉटर कूल्ड इंजिन आहे जे 1200RPM वर 54Nm टॉर्क निर्माण करते. याला 28 लीटरची डिझेल टॅंक देण्यात आली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ट्रॅक्टरला ड्राय ब्रेक्स आणि मेकॅनिकल स्टिअरिंग आहे. याची किंमत ही 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. किंमत मात्र शहरानुसार बदलू शकते याची नोंद घ्यायची आहे.

स्वराज कोड : स्वराज ही देखील ट्रॅक्टरची एक खूपच जुनी आणि विश्वसनीय कंपनी म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. जर आपण स्वराज कंपनीचा मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर स्वराज कोड 2WD ट्रॅक्टर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा ट्रॅक्टर एक पावरफुल ट्रॅक्टर असून टू व्हील ड्राईव्ह आहे. यामुळे जर तुम्ही फोरविल ड्राईव्हच्या शोधात असाल तर तुम्हाला दुसरा ट्रॅक्टर घ्यावा लागणार आहे.

पण जर तुम्हाला टू व्हील ड्राईव्ह चालून जाईल तर हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा शेतात काम करण्यासाठी एक छोटा परंतु अतिशय शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. हा एक मिनी ट्रॅक्टर असून बागकामाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. जर तुम्हीही फळबाग लावलेली असेल आणि फळबागांमध्ये अंतर्मशागतीसाठी ट्रॅक्टर आवश्यक असेल तर हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय राहणार आहे.

कारण की या ट्रॅक्टरची किंमत इतरांपेक्षा कमी आहे. हा ट्रॅक्टर 11HP चा आहे. या ट्रॅक्टरमध्ये 389CC चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ट्रॅक्टरचे वजन सुमारे 455 किलो आहे आणि त्याची वजन उचलण्याची क्षमता 220 किलो आहे. याला 9 गीअर्स आहेत त्यापैकी 6 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत. याची किंमत 2.45-2.50 लाख रुपये दरम्यान आहे.

कुबोटा निओस्टार A211N-OP : जेव्हा मिनी ट्रॅक्टर बाबत बोललं जातं तेव्हा कुबोटाचा विषय येतोच. कुबोटा हा ब्रँड मिनी ट्रॅक्टर मध्ये खूपच लोकप्रिय ठरलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना कुबोटाचा मिनी ट्रॅक्टर विशेष आवडतो. यामुळे जर तुम्हीही मिनी ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर कुबोटाचा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा एक 21 एचपी चा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरमध्ये 1001 cc चे 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ड्राय सिंगल प्लेट क्लच सिस्टीम आहे. स्टीयरिंग मॅन्युअल आहे, 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत. त्याची किंमत 4.40 लाख रुपयांपासून सुरू होते. जर आपणास फळबागेतील आंतरमशागतीसाठी तसेच फवारणीसाठी किंवा इतर शेतीकामांसाठी पावरफुल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

न्यू हॉलंड सिम्बा 30 : न्यू हॉलंड ही पण ट्रॅक्टरची एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीचा मिनी ट्रॅक्टर सिम्बा 30 हा एक लोकप्रिय मिनी ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये 4 व्हील ड्राइव्ह आणि 29 एचपीच इंजिन आहे. यामुळे जर तुम्ही 30 एचपी चा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे.

यात 9 फॉरवर्ड गीअर्स आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत. ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीयरिंग आणि ऑइल एमर्स ब्रेक आहेत. याची वजन उचलण्याची क्षमता 750 किलो आहे. ट्रॅक्टरची किंमत 5 लाख रुपयांपासून सुरू होते. हा एक पावरफूल ट्रॅक्टर असून शेती कामांसाठी खूपच फायदेशीर आहे.

Leave a Comment