राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे गिफ्ट मिळणार, काय लाभ होणार ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, या चालू महिन्यात नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मोठा सण साजरा होणार आहे.

एवढेच नाही तर पुढल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

दरम्यान या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, दिवाळी सणापूर्वी राज्य शासन एक मोठा निर्णय घेणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, दिवाळी सणाच्या पूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना दोन मोठे लाभ मिळणार आहेत. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.

काय लाभ मिळणार?

यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबर पासून साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना सण अग्रीम दिली जाणार आहे. खरं तर दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना काही रक्कम सण म्हणून दिली जाते.

यावर्षी देखील ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम राज्य कर्मचाऱ्यांना विना व्याज परतावा दिली जाते आणि या रकमेची वसुली रक्कम दिल्यानंतर पुढील दहा महिन्यांच्या काळात कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाते.

सण अग्रीम रक्कम राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ठरवली जाते. पण गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये एवढी सण अग्रीम दिली जात आहे. यामुळे यावर्षीही एवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना मिळू शकते अस सांगितलं जात आहे.

याबाबत मात्र राज्य शासनाकडून कोणतीच माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु सण अग्रीमचा लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत दिला जाणार एवढे नक्की.

महागाई भत्ता वाढणार ?

यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42% एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ करणे प्रस्तावित आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. अर्थात महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे.

याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत (Paid In November) याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून ही वाढ लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार असा दावा केला जात आहे. 

Leave a Comment