State Employee News : केंद्र शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के एवढा केला आहे. सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्यातील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने अजूनही महागाई भत्ता वाढी संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. यामुळे राज्य सरकार याबाबतचा निर्णय कधी घेणार हा मोठा सवाल आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढू शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढ ?
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे. सध्या स्थितीला राज्यातील या सरकारी नोकरदार मंडळीला 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
हा महागाई भत्ता जुलै 2023 पासून लागू आहे. दरवर्षी शासनाच्या माध्यमातून सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यात महागाई भत्ता दर सुधारित होतात.
यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता दर सुधारित करण्यात आला असून महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46 टक्क्यांवरून 50 टक्के एवढा होणार आहे.
या सदर मंडळीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर जानेवारी 2024 पासून याचा लाभ दिला जाणार आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे.
ही आचारसंहिता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि तदनंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
पुढील महिन्यात अर्थातच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो असा दावा काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
असे झाले तर जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारांसोबत याचा रोख लाभ मिळू शकणार आहे. या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.