राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अखेर 50% केव्हा होणार ? समोर आली नवीन तारीख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केला.

त्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अद्याप महागाई भत्ता वाढी संदर्भातला निर्णय झालेला नाही.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचारसंहिता सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता सुरूच राहणार आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला लागणार आहे.

दरम्यान हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वर्तमान शिंदे सरकार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होणार आहे. हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू केला जाणार आहे.

याचा रोख लाभ जून महिन्याच्या पगारांसोबत मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Comment