State Employee News : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमचा महागाई भत्ता केव्हा वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र सदर मंडळीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 50 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 4% वाढ होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच लागू होणार DA वाढीचा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा रोख लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार सोबत दिला गेला आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळाली आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा आहे.
सध्या संपूर्ण देशभर आचारसंहिता सुरू आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ रखडली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्थातच 4 जून नंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.
ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून लागू केली जाणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे.
जर राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारांसोबत म्हणजे जे वेतन जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा रोख लाभ मिळाला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम वितरित केली जाणार आहे.
निश्चितच जूनच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात भरीव वाढ होणार आहे.