State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी कर्मचारी असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा हप्ता मिळणेबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक विभागाने एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले आहे.
या परिपत्रकात सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतनासाठी किती तरतूद झाली आहे हे नमूद करण्यात आले असून संबंधित शिक्षकांच्या सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता, वैद्यकीय देयके, रजा प्रवास सवलत, थकित देयके अदा करण्यासाठी शासनाकडे किती तरतुदीची मागणी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे.
यामुळे आज आपण प्राथमिक शिक्षक संचालन विभागाने किती तरतूद करण्याची मागणी केली आहे याबाबत जाणून घेणार आहोत. सदर पत्रकानुसार, राज्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना वर्ष २०२३-२४ मध्ये वैद्यकीय देयके अदा करणेसाठी रक्कम रू. २६०,५९,८८,०००/-, रजा प्रवास सवलत अदा करणेसाठी रक्कम रु. २३,७४,१६,०००/-, थकीत देयके अदा करणेसाठी रक्कम रू. १२८,२०,४५,०००/-, सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता अदा करणेसाठी रक्कम रु. ९६,९७,२६,०००/-, दुसरा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रू. ८९३,७०,५१,०००/- तिसरा हप्ता अदा करणेसाठी ९६६,४५,६५,०००/- चौथा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रु. ११५०,००,००,०००/- व इतर देयके अद करणेसाठी रक्कम रू. ८४,७०,७१,०००/- इतक्या जास्तीच्या तरतूदीची आवश्यकता आहे.
अशा परिस्थितीत सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये रक्कम रु. ३५०४,३८,७०,०००/- इतक्या तरतूदीची पुरवणी मागणी संचालनालयाकडून शासनास करण्यात आली आहे.
आता सदर पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदांना मंजूर तरतूद विवरण पत्रानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे. निश्चितच या संबंधित कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे.