महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! श्रीलंकेतून आली गोड बातमी; ‘या’ कारणाने कांदा दरात होणार विक्रमी वाढ 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Hike : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषता कांदा उत्पादकांसाठी ही बातमी कामाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी दरात कांद्याची विक्री करावी लागली आहे.

या कालावधीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होत होती. देशांतर्गत वाढलेल्या कांदा आवकेमुळे आणि श्रीलंका तसेच बांगलादेशात ठप्प झालेल्या कांदा निर्यातीमुळे आणि देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठ्यामुळे बाजारभावात घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले.

जून महिन्यापर्यंत कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा सरासरी भाव मिळत होता. काही बाजारात पाच ते सहा रुपये दर मिळत होता मात्र हा भाव पिकासाठी आलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी देखील अपुरा होता. परिणामी या कालावधीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च भरून काढता आला नाही.

अनेकांना तर वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील वसूल करता आला नाही. मात्र जुलै महिन्यात ही परिस्थिती बदलली. बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या कांदा निर्यातीमुळे आणि नाफेडने सुरू केलेल्या कांदा खरेदीमुळे कांदा दरावरील दबाव कमी झाला. बाजारभावात सुधारणा झाली.

अशातच राज्यातील कांदा उत्पादकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बांगलादेश पाठोपाठ आता श्रीलंकेत देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत यावर्षी आर्थिक अडचणीमुळे केवळ दहा टक्के क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.

साहजिकच यामुळे तेथे कांद्याचा तुटवडा जाणवणार आहे. यामुळे मागणीची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणी कांद्याची आयात होणार आहे. यामुळे भारतातून श्रीलंकेत कांदा निर्यातीसाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचा दावा काही बाजारात अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

खरतर श्रीलंकेत ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून नवीन कांदा बाजारात येतो. हा कांदा दोन ते तीन महिने टिकतो. यामुळे तिथे आयात शुल्क लावले जाते. पण यंदा उत्पादनात आलेली घट पाहता आयातदारांकडून श्रीलंका सरकार कांदा आयात शुल्क आकारणार नाही असे चित्र आहे.

जरी आयातशुल्क आकारले गेले, तरीही ते दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तग धरू शकेल असं मत काही तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केल जात आहे. साहजिकच यामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊ शकते. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारभावात वाढ होणार आहे.

याव्यतिरिक्त, मलेशियामध्ये देखील आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलेशियात पाकिस्तानच्या कांद्याला वीस टक्के आणि भारतीय कांद्याला 80 टक्के प्रतिसाद मिळत आहे. वाहतुकीचे कमी अंतर यामुळे आपल्या देशातील कांदा मलेशियात मोठ्या प्रमाणात जात असल्याचे सांगितले जात आहे.

वास्तविक, प्रमुख कांदा उत्पादक राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त असलेल्या पाकिस्तानमध्ये यंदा २० टक्के अधिक कांद्याचे उत्पादन झाले आहे. पाकिस्तान मधील कांदा हा प्रामुख्याने आखाती देशात विक्रीसाठी जातो. मात्र पाकिस्तान मधील कांद्याची गुणवत्ता पाहता आखाती देशातील आयातदारांकडून भारतीय कांद्याला पसंती दाखवली जात आहे.

आखाती देशांमधूनही भारतीय कांद्याला 20% प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दक्षिणेत विशेषता प्रमुख कांदा उत्पादक राज्य कर्नाटक मध्ये नवीन कांदा दाखल झाला आहे. हा कांदा मात्र आकाराने छोटा असून किलोला 28 ते 29 रुपये असा भाव घेत आहे. यामुळे निर्यातदार आता नाशिक मधील कांदा खरेदीला अधिक प्राधान्य देत असल्याचे सांगितले जात आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कांदा दरात सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे येत्या तीन ते चार आठवड्यानंतर महाराष्ट्रातील कांद्याला आणखी भाव मिळणार आहे. अर्थातच भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.निश्चितच ही सारी परिस्थिती पाहता आगामी काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असे सांगितले जात आहे.

यामुळे आता बाजारात अभ्यासकांचा अंदाज खरा ठरतो का आणि भविष्यात बाजारभावात आणखी सुधारणा होते का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला 1150 रुपये प्रति क्विंटल ते 1450 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळत आहे. या भावात अजून वाढ झाली तर शेतकऱ्यांना दोन पैसे पदरात पडतील अशी आशा आहे.

Leave a Comment