आजही राज्यभर पावसाची धुवाधार बॅटिंग; ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस ! मुंबई, पुणेसाठी अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Pune Mumbai Rain Alert : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला आणि त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाची धुवाधार बॅटिंग होत आहे. यामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील काही भागात पूरस्थिती तयार झाली आहे. सध्या सुरू असलेल्या या पावसामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून धरणाचा जलाशयात देखील भर पडत आहे.

काही भागात अतिवृष्टी झाली असल्याने तेथेही पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि विदर्भातील अनेक भागात पूर सदृश्य परीस्थिती पाहायला मिळाली आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आजही राज्यभर मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने आज कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

कोकणातील या जिल्ह्यात पडणार पाऊस 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 जुलै रोजी कोकणातील पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर पालघर साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पडणार पाऊस

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात विशेषता घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुण्यात आज घाट परिसरात काही ठिकाणी दोनशे मिमी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

अर्थातच त्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील या जिल्ह्यात पडणार पाऊस

आज विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाने आजसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Leave a Comment