राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणार एवढ्या रजा, शासनाने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील जवळपास 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार येत्या नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तब्बल 24 शासकीय सुट्ट्या मिळणार आहेत तसेच एक अतिरिक्त सुट्टी राज्य शासनाकडून दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे यापैकी नऊ शासकीय सुट्ट्या या शनिवार आणि रविवारला जोडून आल्या आहेत. अर्थातच पुढल्या वर्षी तब्बल नऊ वेळा सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस किंवा सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.

यामुळे पुढल्या वर्षी तब्बल 9 वेळा राज्य कर्मचाऱ्यांचा विकेंड गोड होणार आहे. दरम्यान आता आपण राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या दिल्या जाणार आहेत म्हणजे राज्य शासनाने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या तारखांना राहणार शासकीय सुट्टी

राज्य शासनाने नुकतीच नवीन वर्ष 2024 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी सार्वजनिक केली आहे. त्यामध्ये 24 शासकीय सुट्ट्या राहणार आहेत आणि एक अतिरिक्त सुट्टी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार,

शुक्रवार, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

सोमवार, १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती

शुक्रवार, ८ मार्च महाशिवरात्री

सोमवार २५ मार्च होळी (दुसरा दिवस)

शुक्रवार, २९ मार्च गुड फ्रायडे 

मंगळवार, ९ एप्रिल गुढीपाडवा 

गुरुवार, ११ एप्रिल रमझान ईद

रविवार, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

बुधवार, १७ एप्रिल रामनवमी

रविवार, २१ एप्रिल महावीर जयंती

बुधवार, १ मे महाराष्ट्र दिन 

गुरुवार, २३ मे बुद्ध पौर्णिमा

सोमवार १७ जून बकरी ईद (ईद उल झुआ)

बुधवार, १७ जुलै, मोहम

गुरुवार, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

गुरुवार, १५ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)

शनिवार, ७ सप्टेंबर गणेश चतुर्थी

सोमवार, १६ सप्टेंबर ईद-ए-मिलाद

बुधवार, २ ऑक्टोबर म. गांधी जयंती

शनिवार, १२ ऑक्टोवर दसरा

शुक्रवार, १ नोव्हेंबर दिवाळी आमावस्या (लक्ष्मीपूजन)

शनिवार, २ नोव्हेंबर दिवाळी (बलिप्रतिपदा)

शुक्रवार १५ नोव्हेंबर गुरुनानक जयंती

बुधवार २५ डिसेंबर ख्रिसमस निमित्ताने राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment