राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत महाराष्ट्र राज्य शासन सकारात्मक ! निर्णय केव्हा होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee Retirement Age : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या काही प्रमुख मागण्यांसाठी लढा देत आहेत. यामध्ये 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करणे ही एक प्रमुख मागणी आहे.

यासाठी कर्मचारी वारंवार आंदोलने करत आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपदेखील कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. यासोबतच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे ही देखील राज्य कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. केंद्र शासनाने याआधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या 58 वर्षांच्या वयात दोन वर्षे वाढ केली असून सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच देशभरातील जवळपास 25 राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे महाराष्ट्र राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तसेच देशभरातील अनेक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झालेले असतानाही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय का वाढवले जात नाही ? हा वाजवी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यासाठी आता कर्मचारी आक्रमक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडे विविध संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. विशेष बाब अशी की, महाराष्ट्र राज्य शासन देखील या मागणीवर सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शासन सकारात्मक आहे मग यावर लवकर निर्णय का घेतला जात नाही हा प्रश्न देखील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

दरम्यान आता सेवानिवृत्तीच्या वयाबाबत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्य कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे करणे बाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन आहे.

यामुळे आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रस्तावावर सकारात्मक विचार करेल आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करेल असा आशावाद आता व्यक्त होत आहे.

अशातच, एक महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात जवळपास अडीच लाख पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या रिक्त जागा एकाच वर्षात भरणे राज्य शासनाला अशक्य आहे.

शिवाय राज्य शासनाच्या काही विभागात असे काही पदे आहेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर भरली जाऊ शकत नाही. परिणामी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचे राज्य शासनाकडे पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment