राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार मोठी भेट ! सेवानिवृत्तीचे वय ‘इतके’ वाढणार, प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee Retirement Age : जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरंतर गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून मागणी केली जात आहे.

यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला आहे. परंतु शासनाकडून याबाबत कोणताच सकारात्मक असा निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आलेला नाही. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी मार्च 2023 मध्ये अभूतपूर्व असे बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते.

त्यावेळी सरकार बॅकफुटवर आले होते. विशेष म्हणजे सरकारने जुनी पेन्शनच्या मागणीबाबत विचार करण्यासाठी एका समितीची देखील स्थापना केली होती. या समितीला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तीन महिन्यांची मुदत उलटल्यानंतर या समितीला पुन्हा एकदा दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. ही दोन महिन्यांची अतिरिक्त मुदत 15 ऑगस्ट रोजी संपली आहे.

मात्र, अजूनही या समितीने शासनास आपला अहवाल सोपवलेला नाही. यामुळे जुनी पेन्शन योजना देण्यास महाराष्ट्र राज्य शासन टाळाटाळ करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे साहजिकच राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

तसेच विधानसभा निवडणूकांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांची ही नाराजी वर्तमान सरकारला मोठी महागात पडण्याची शक्यता देखील जाणकार वर्तवत आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकांपूर्वी वर्तमान सरकार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासन लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवू शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय मात्र 60 वर्षे आहे. यासोबतच देशभरातील इतरही अनेक राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे एवढे आहे.

यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आता राज्य सरकार सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

विशेष म्हणजे राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन असल्याचे सांगितले होते. यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि राज्य कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली जाऊ शकते असा दावा आता केला जाऊ लागला आहे. यामुळे आता शिंदे सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment