State Employee : सध्या संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाची धूम आहे. नवरात्र उत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दांडीया, गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्र उत्सवाची रंगत वाढली आहे. नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
शिवाय पुढील महिन्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील संबंधित कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सण गोड होणार आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार अनुदान
शिंदे सरकारने दिवाळी सणाला राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सण यंदा गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकारकडून दिवाळीच्या सणाला एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.
सण अग्रीम आणि पगारही दिवाळीपूर्वीच मिळणार
याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना सण अग्रीम म्हणून 12,500 रुपये दिले जाणार आहेत आणि दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्यांचे वेतन 43 हजार 477 एवढे आहे त्यांना 12500 सणं अग्रीम म्हणून दिले जाणार आहेत.
या सोबतच गेल्या वर्षी ज्याप्रमाणे शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांचे सानुग्रह अनुदान दिवाळी सणाला दिले होते. त्याचप्रमाणे यंदाही दिवाळी सणाला एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
या निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयाचे एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.