Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही भरती प्रक्रिया जाहीर झाली असून या भरतीसाठी अकरा लाखाहुन अधिक उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला आहे. आता या लाखो अर्जदार उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे 4 हजार 666 तलाठी पदाच्या भरती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तलाठी भरती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि पेपरची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या तलाठी पदासाठीची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. आता या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या अर्जदार उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळवले जाणार आहे.
तलाठीची परीक्षा प्रत्येक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. या भरतीसाठी जवळपास 11 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे. यामुळे या लाखो उमेदवारांना परीक्षा देताना कोणतीच अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहे. तलाठीची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात एकूण तीन सत्रात होणार आहे.
सकाळी ९ ते ११, दुपारी साडेबारा ते अडीच आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा दरम्यान तलाठी भरतीचा पेपर आयोजित केला जाणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा कुठे होणार? म्हणजे कोणत्या शहरात होणार हे दहा दिवस आधी समजणार आहे मात्र कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार याची माहिती उमेदवारांना तीन दिवस आधी दिली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताच गैरप्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
कोणत्या तारखेला होणार तलाठीचा पेपर ?
तलाठीची परीक्षा एकूण तीन टप्प्यात पार पाडली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला पेपर होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 26 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी पेपर होणार आहे.
तसेच तिसरा टप्प्यात 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर रोजी पेपर होणार आहे.