सप्टेंबर महिन्यातही ऑगस्ट महिन्यासारखाच कमी पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळेच ज्यावर्षी चांगला पाऊसमान राहतो त्यावर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते आणि ज्या वर्षी पाऊसमान चांगला राहत नाही त्यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते.

यंदा मात्र अगदी सुरुवातीपासूनच मान्सूनबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. सुरुवातीच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे यंदा दुष्काळ पडणार असे मत व्यक्त होत होते. पण जुलै महिन्यात पावसाने आपले रुद्र रूप दाखवले आणि राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली.

राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात अतिवृष्टी झाली आणि अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे यंदा देखील मान्सून चांगला बरसणार आणि शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पादन मिळणार असा आशावाद कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात होता.

अशातच गेल्या दहा दिवसांपासून म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच राज्यात मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढू लागली आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस राहणार असा महत्त्वाचा अंदाज नुकताच वर्तवण्यात आला आहे.

साहजिकच हवामान विभागाचा हा अंदाज आणि प्रत्यक्षात पावसाने मारलेली दडी पाहता शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनाबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. पण अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि कामाचा माहितीवजा हवामान अंदाज दिला आहे.

काय म्हणताय पंजाबराव ?

पंजाबरावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर, राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

याचाच अर्थ यावर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन भर पावसात साजरा करावा लागणार आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील पहिला पंधरवाडा हा कोरडाच राहणार असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे.

पण सप्टेंबर महिन्यातील दुसरा पंधरवाडा म्हणजेच 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या बाबतीत देखील असच घडणार असून ऑक्टोबर महिन्यातील 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment