Tata New Electric Car : टाटा आणि महिंद्रा या दोन्ही देशातील लोकप्रिय ऑटो कंपन्या आहेत. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे टाटा आणि महिंद्रा या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देखील धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. विशेषता टाटा बाबत बोलायचं झालं तर इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटाचा चांगला बोलबाला आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाची मक्तेदारी आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा वाटा 75 टक्के एवढा आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाने एक हाती सत्ता राखली आहे. दरम्यान टाटा कंपनी आणखी एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवणार आहे.
एवढेच नाही तर महिंद्रा देखील एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करणार अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता आपण टाटा आणि महिंद्राच्या या अपकमिंग इलेक्ट्रिक गाड्यांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
महिंद्रा XUV.e8 : महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. दरम्यान कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लक्ष केंद्रित करून आहे. त्यामुळे कंपनी लवकरच आता एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक XUV 2024 च्या अखेरीस शोरूममध्ये येणार अशी आशा व्यक्त केली जात आहे आहे.
XUV.e8 ही कंपनीची इलेक्ट्रिक कार यावर्षी अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी आशा आहे. आगामी कारची रचना XUV700 सारखी असू शकते. या कारमध्ये ग्राहकांना 450 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामुळे आता ही गाडी नेमकी केव्हा लॉन्च होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
Tata Curvy EV : मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट मधला आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी लवकरच बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करणार आहे. पंच ईव्ही लाँच केल्यानंतर टाटा मोटर्स आता कर्व्ह ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लाईव्ह हिंदुस्तान या प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर येत आहे.
खरेतर ही Curve EV भारतात अनेक वेळा दिसली आहे. ही आगामी इलेक्ट्रिक कार चाचणी दरम्यान पाहायला मिळाली आहे. यावरून Curve EV ही गाडी लवकरच लॉन्च होणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर पर्यंत चालू शकते असा दावा होत आहे. यामुळे आता ही कार नेमकी केव्हा लॉन्च होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.