ठाणे ते बोरिवली प्रवास होणार फक्त 15 मिनिटात, ‘या’ प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची मंजुरी, MMRDA काय म्हटले पहा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Borivali Twin Tunnel : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून संपूर्ण जगात खायतनाम आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनली आहे. यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठाणे ते बोरिवली या दरम्यान प्रवास करताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हेच कारण आहे की या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी ठाणे ते बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, या प्रकल्पासमोर एक नवीन संकट उभे राहिले होते. या प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक होती. यामुळे या प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते. आता मात्र या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकणार आहे.

कारण की, या प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत आहे.

वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रविवारी ही माहिती दिली आहे.

MMRDA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहर आणि बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (SGNP) जाईल आणि पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार आहे.

त्यामुळे भविष्यात, जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ठाणे ते बोरिवली हा प्रवास फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये एमएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला मान्यता मिळाली असल्याचे सांगितले आहे. हा दुहेरी बोगदा 16,600.40 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून त्याची एकूण लांबी 11.8 किमी असेल.

यापैकी 1.55 किलोमीटरचा लिंक रोड असणार आहे. या बोगद्याचा बाह्य व्यास 13.05 मीटर असेल आणि दर 300 मीटरवर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाणारा रस्ता असेल. म्हणजे क्रॉस पॅसेज असेल. प्रत्येक बोगद्याला दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन सुद्धा राहणार आहे.

प्रकल्प अंतर्गत ठाणे ते बोरिवली दरम्यान 6.1 किलोमीटर लांबीची टनेल विकसित होणार असून बोरिवली ते ठाणे यादरम्यान 5.75 किलोमीटर लांबीची टनेल विकसित होणार आहे. एका बोगद्यात तीन लेन राहणार आहेत. त्यामध्ये एक इमर्जन्सी साठी राहील. या संपूर्ण प्रकल्पाचे काम 3 वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट एमएमआरडीएने ठेवले आहे. 

Leave a Comment