Tractor Purchase Tips:- ट्रॅक्टर हे शेती कामामध्ये वापरली जाणारे बहुउपयोगी यंत्र असून शेतीतील विविध कामांसाठी बाकीचे जे यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत त्यातील बरेच यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्व आणखीनच वाढते.  सध्याच्या परिस्थितीत छोटे शेतकरी असो वा मोठे हे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचे सध्या चित्र आहे.

परंतु ट्रॅक्टर खरेदी करताना नेमका तो कोणता ट्रॅक्टर घ्यावा किंवा किती एचपीचा किंवा कोणत्या कंपनीचा घ्यावा? इत्यादी अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या सहकारी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे तोच ट्रॅक्टर बरेचजण खरेदी करतात.

Advertisement

त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या शेतातील कामाकरिता ट्रॅक्टर घेत आहात की भाडेपट्ट्यावर देण्यासाठी घेत आहात म्हणजेच तुमचे ट्रॅक्टर खरेदी करतात उद्देश काय आहे? एखादी गोष्टींना सुद्धा प्राधान्य देणे गरजेचे असते. साधारणपणे शेतासाठी ट्रॅक्टर घेत असताना काही गोष्टींचा विचार आणि अभ्यास करून ट्रॅक्टर घेणे फायद्याचे ठरते.

 ट्रॅक्टर खरेदी करताना या गोष्टी पहा

Advertisement

1- तुमचा पैशांचा बजेट पहावा यामध्ये तुम्ही सर्वात अगोदर ट्रॅक्टर खरेदीसाठी मोजावे लागणारे पैश्याबद्दल सर्वप्रथम विचार करणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर खरेदी सोबतच आरटीओ, विम्याचा खर्च इत्यादी खर्च देखील यामध्ये तुम्ही धरावेत व जुना ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर ट्रॅक्टरचे सध्याची कंडीशन कशी आहे व तो पुढील किती वर्ष काम करू शकेल याचा देखील अंदाज घेणे गरजेचे आहे.

जुना ट्रॅक्टर घेत असाल तर त्याची मालकी बदलण्यासाठी देखील खर्च येत असतो त्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. तसेच दुसरे म्हणजे ट्रॅक्टर जुना असल्याने त्याच्यामध्ये ताबडतोब काही तुम्हाला रिपेरिंग करावी लागू शकते का व करावी लागत असेल तर त्याचा खर्च याचा देखील अंदाज घेणे गरजेचे आहे.

Advertisement

म्हणजेच एकंदरी ट्रॅक्टर जुना असो किंवा नवा यामध्ये करावा लागणारा प्रत्येक खर्चाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे आर्थिक बजेट पाहून तुम्ही कोणत्या श्रेणीचा ट्रॅक्टर विकत घ्यावा याचा अंदाज येऊ शकतो.

2- ट्रॅक्टर खरेदी करण्याचा उद्देश पहावा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करत आहात परंतु नेमका कोणत्या कामासाठी करत आहात याचा विचार करणे गरजेचे आहे. ट्रॅक्टरला तुम्ही जर काही अवजारे किंवा यंत्रे जोडणार आहात का याचा देखील विचार करावा. त्यामुळे अशी यंत्र जोडता येतील व त्या यंत्रांना आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी ते ट्रॅक्टर उत्तम पॉवर देण्याची क्षमता असलेले आहे का? हा विचार होणे गरजेचे आहे.

Advertisement

3- मेंटेनन्सचा विचार कुठले यंत्र राहिले म्हणजे त्याचा मेंटेनन्सचा खर्च किंवा मेंटेनन्स म्हणजेच देखभाल करावी लागते. त्याच पद्धतीने तुम्हाला ट्रॅक्टरची देखील नियमित देखभाल करणे गरजेचे असून त्याकरिता आवश्यक असणारे सर्विस सेंटर किंवा स्थानिक गॅरेज तुमच्या आजूबाजूला उपलब्ध असणे गरजेचे आहे.

कारण मेंटेनन्स साठीचे अंतर आणि दर्जा देखील तुमच्या खर्चातील प्रमुख घटक आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ट्रॅक्टर कंपनीची ट्रॅक्टर विक्रीनंतर सेवा चांगली आहे व ती तुमच्या भागांमध्ये उपलब्ध आहे अशा कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.

Advertisement

4- ट्रॅक्टर नवीन घ्यावा की जुना हा विचार करावा ट्रॅक्टर नवीन घ्यायचा आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून जुना ट्रॅक्टर घ्यायचा आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण ही निवड तुमची आर्थिक क्षमता आणि विश्वास यावर अवलंबून असते. जुने ट्रॅक्टरच्या खरेदी विक्री करिता अनेक एप्लीकेशन बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यावर अशा प्रकारचा व्यवहार हा स्वतःच्या जबाबदारीवर आणि व्यवस्थित तपास करूनच करणे गरजेचे आहे.

5- शेतजमिनीचा विचार करावा ट्रॅक्टरचे जर आपण प्रकार पाहिले तर ते कमी ते उच्च पावर पर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करताना तुमच्या परिसर शेतीच्या दृष्टिकोनातून कसा आहे त्यानुसार देखील तुम्ही निवड करणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे कमी शेती असेल तर कमी क्षमतेचा ट्रॅक्टर फायद्याचा ठरू शकतो.

Advertisement

परंतु जर तुमची शेतीचे काम करून तुम्हाला इतर कामांसाठी भाडेपट्ट्याने ट्रॅक्टर देण्याचा उद्देश असेल तर या पद्धतीने ट्रॅक्टर घेण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. डोंगराळ प्रदेशामध्ये कामांकरिता किंवा वाहतुकीसाठी मध्यम ते उच्च पावरचे ट्रॅक्टर खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

6- तुमच्याकडे असलेल्या शेतीचे क्षेत्र बरेच जण आवश्यकतेपेक्षा जास्त पावरचे ट्रॅक्टर खरेदी करतात व त्यासाठी खूप मोठा खर्च करतात. त्यामध्ये अशा जास्त किमतीचा ट्रॅक्टर घेतल्याने त्याचा घसारा आणि व्याजापोटी बऱ्याचदा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. याच्या उलट तुम्हाला जेवढ्या पॉवरच्या ट्रॅक्टरची आवश्यकता आहे त्यापेक्षा कमी पावरचा ट्रॅक्टर घेतला तरी तुमची कामे वेळेत पूर्ण होत नाही.

Advertisement

साधारणपणे यामध्ये तुमच्याकडे जर दोन हेक्टर जमीन आहे व वर्षातून एकच पीक त्यामध्ये घेतले जाते तर अशा जमिनीसाठी एक हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर पुरेसा होतो. म्हणजे साधारणपणे 40 हेक्टर जमिनी करिता 20 ते 25 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर चांगला ठरतो. परंतु जमीन जर बागायती असेल व त्यामध्ये जर वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेतले जात असतील

तर या  परिस्थितीत मोठा ट्रॅक्टर घेणे गरजेचे आहे व त्यामुळे तुम्ही मोठी यंत्रे वापरून कामे करू शकतात व वेळेत कामे करणे शक्य होते. साधारणपणे भारतात 45 ते 60 हॉर्स पावरचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *