पीएम किसान योजनेबाबत सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.

या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरूच आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केंद्र शासन वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ देत आहे.

एका आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च ते मार्च या बारा महिन्यांच्या कालावधीत या योजनेअंतर्गत एकूण सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र हे 6000 रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे मिळत आहे.

आतापर्यंत या योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले गेले आहेत. या योजनेच्या सोळाव्या हप्त्याबाबत बोलायचं झालं तर हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान आता या योजनेचा पुढील सतरावा हप्ता कधी जारी होणार या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या सतराव्या हप्त्याची अधिकृत तारीख लवकरच केंद्रातील सरकारच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांची मतदानाची प्रक्रिया सध्या स्थितीला सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान सध्या स्थितीला देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या योजनेचा पुढील हप्ता अर्थात सतरावा हप्ता हा आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे.

4 जून नंतर कधीही या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील सतरावा हप्ता देण्याची घोषणा करणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुमारास या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या योजनेच्या पुढील हप्त्याची घोषणा नवीन सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे.

निश्चितचं जर जून महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला तर खरीप हंगामात शेतकऱ्यांना या पैशांचा उपयोग घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे पीएम किसानच्या 17 व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. पण अद्याप या संदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच याबाबत सरकारच्या माध्यमातून घोषणा केली जाणार आहे.

Leave a Comment