Government Employee News : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर आठवा वेतन आयोगाची भेट मिळणार अशी आशा आहे. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. यासाठी 2014 मध्ये समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच आयोगाची स्थापना होऊन दोन वर्षांनी आयोग लागू करण्यात आला. सातवा वेतन आयोग हा सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर दहा वर्षांनी लागू करण्यात आला होता.

6 वा वेतन आयोग 2006 साली लागू झाला होता. म्हणजेच दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू नये अपेक्षित आहे. तत्पूर्वी मात्र नवीन वेतन आयोगाची स्थापना करावी लागणार आहे. मात्र केंद्र शासनाने सध्या स्थितीला केंद्र शासन दरबारी नवीन वेतन आयोग लागू करणेबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Advertisement

मात्र असे असेल तरी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल असा अंदाज आहे.

पगारात किती वाढ होणार

Advertisement

केंद्र सरकारने 8 वा वेतन आयोग लागू केल्यास फिटमेंट फॅक्टर देखील वाढणार आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये फिटमेंट फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन सुद्धा फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते. 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर बदलण्यात आला. तेव्हापासून 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर लागू आहे.

आता मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे. सरकारने फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. जर सरकारने फिटमेंट फॅक्टर एवढा वाढवला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 44% ने वाढणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18000 एवढा आहे मात्र यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 26000 जाणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *