Post Office Scheme : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आकडेवारी मधून स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे.
आपण गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित रहावी आणि त्यावर एक निश्चित परतावा मिळावा यासाठी अनेक जण आजही बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि आरडी योजनामध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवतात.
दरम्यान जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा चार बचत योजनांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या चार लोकप्रिय बचत योजनांविषयी.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना : पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना अर्थातच टीडी योजना ही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय बनली आहे. या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात.
या योजनेचे स्वरूप एफडी योजनेप्रमाणेच असल्याने याला FD योजना म्हणून ओळखली जाते. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम : पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम ही पाच वर्षांची योजना आहे. या स्मॉल सेविंग स्कीम मध्ये किमान 1000 रुपयापासून गुंतवणूक करता येते. योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा नाहीये.
म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला जेवढा पैसा हवा आहे तेवढा पैसा तो या ठिकाणी गुंतवू शकतो. या योजनेवर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 7.7% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : पोस्टाची ही सर्वाधिक व्याज देणारी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पाच वर्षांसाठी पैसा गुंतवला जातो. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर पोस्टाच्या माध्यमातून 8.2% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम मध्ये सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते. सिंगल अकाउंट मध्ये कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट मध्ये कमाल 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
या रकमेवर पोस्टाच्या माध्यमातून 7.4% या व्याजदराने परतावा दिला जात आहे. जॉइंट अकाउंट ओपन करून एखाद्या गुंतवणूकदाराने 15 लाख रुपये गुंतवले तर त्याला दरमहा 9250 रुपये व्याज मिळणार आहे. जर सिंगल अकाउंट ओपन करून 9 लाख गुंतवलेत तर सदर गुंतवणूकदाराला महिन्याकाठी 5 हजार 550 रुपयांचे व्याज मिळणार आहे.