Tourist Place In India:- पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून जर आपण भारताचा विचार केला तर भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून तर पूर्वेपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये पर्यटन स्थळ आपल्याला आढळून येतात. भारताचा एकंदरीत जर आपण भौगोलिक विस्तार पाहिला किंवा भौगोलिक विविधता पाहिली तर ती वनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे.

भारताला मोठ्या प्रमाणावर निसर्गाने भरभरून दिले असून प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळे आहेत आणि प्रत्येक राज्य पर्यटन स्थळांच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. त्या बाबतीत जर आपण भारतातील काही पर्यटन स्थळांचा विचार केला तर या पर्यटन स्थळांना भारतातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांना देखील मोठ्या प्रमाणावर भुरळ पडते.

Advertisement

 भारतातील महत्त्वाचे पर्यटन स्थळे

1- वाराणसी वाराणसी हे उत्तर भारतातील एक महत्त्वाचे शहर असून ते संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. वाराणसी या शहराचे अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून हिंदूंसाठी याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे.

Advertisement

वाराणसी या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक हजेरी लावतात. हे एक अध्यात्म व धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र असून गंगा नदीच्या काठी वसलेले हे शहर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ धाम या ठिकाणी आहे. वाराणसी शहरालाच काशी असे देखील म्हटले जाते व हे मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

2- आग्रा आग्रा हे शहर उत्तर प्रदेश राज्यात असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेले ताजमहाल या शहरात आहे. युनेस्कोने त्याला आपल्या हेरिटेजमध्ये महत्त्वाचे स्थान दिले असून ताजमहल पाहण्यासाठी प्रदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत असतात.

Advertisement

ताजमहालाची ख्याती आणि सौंदर्य संपूर्ण जगात प्रसिद्ध असून हे पांढऱ्या संगमरवर मध्ये बांधलेले आहे. या व्यतिरिक्त आगरा येथे ताज संग्रहालय तसेच अकबराचा मकबरा इत्यादी महत्त्वाची ठिकाणे देखील पर्यटकांसाठी महत्त्वाचे आहेत.

3- जयपुर जयपुर हे राजस्थान मध्ये असून राजस्थान मधील बहुतेक शहरे ही पर्यटन स्थळे आहेत व त्यापैकी जयपूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तुम्ही तर बघितले तर जयपुर पासून उदयपूर आणि जैसलमेर पासून अजमेर पर्यंत अनेक किल्ले तसेच राजवाडे व महत्त्वाचे धार्मिक स्थळे येथे आहेत.

Advertisement

हे सगळे पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे हजेरी लावतात. जयपुर मध्ये तुम्ही सिटी पॅलेस तसेच अंबरपॅलेस, जंतर-मंतर, नहारगड किल्ला आणि जयपूर किल्ला पाहू शकतात.

4- गोवा भारतातील गोवा या ठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक हजेरी लावतात. परदेशी पर्यटकांची सगळ्यात मोठी पसंती गोव्याला आहे.सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यातील बीचेस तसेच क्रूझ पार्टी अशा विविध गोष्टी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *