Union Bank Of India FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. खरंतर आपल्या देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे रिस्की ऑप्शन्स देखील आहेत आणि बँकिंग एफडी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, सरकारी बचत योजना, पोस्ट ऑफिसची आणि बँकेचे आरडी योजना इत्यादी योजना उपलब्ध आहेत.
दरम्यान गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आणि इच्छेनुसार या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र भारतीय गुंतवणूकदारांचा एक माईंडसेट क्लियर आहे की, आपण कष्टाने कमावलेले पैसे कोणत्याही परिस्थितीत लॉस मध्ये गेले नाही पाहिजेत.
यामुळे आजही बँकेची एफडी योजना फारच लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे बँका देखील आता एफडी करणाऱ्यांना चांगले व्याज ऑफर करत आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याजदर देत आहे.
दरम्यान आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया च्या अशाच एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे.
कोणती आहे ती FD Scheme
युनियन बँक ऑफ इंडिया 7 ते 14 दिवस आणि पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी FD ऑफर करत आहे. दरम्यान आज आपण बँकेच्या 399 दिवसांच्या एफ डी विषयी माहिती पाहणार आहोत.
युनियन बँकेकडून 399 दिवसांच्या एफडी साठी 7.25% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. विशेष म्हणजे हे व्याजदर बँकेकडून 19 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहे.
दरम्यान आता आपण या 399 दिवसांच्या एफडी मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर किती परतावा मिळणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
2 लाखाच्या गुंतवणुकीवर किती परतावा ?
युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एफडी मध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 2 लाख 16 हजार 278 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये 16,278 रुपये व्याजाचे राहणार आहेत. अर्थातच गुंतवणूकदाराला एवढे रिटर्न मिळणार आहेत.