Union Budget 2024 : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका रंगणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका सोबतच विधानसभा निवडणूकीसाठी देखील तयारी सुरू करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील विविध निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करणार आहे.
खरंतर पुढल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहेत.
यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या काय काय घोषणा होतात हे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच बजेट सादर झाल्यानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका रंगणार असल्याने या बजेटमध्ये आधीच्या बजेटच्या तुलनेत अधिक घोषणा होऊ शकतात अशी आशा आहे.
खरतर अंतरिम बजेटमध्ये आधीच्या सरकारांच्या कार्यकाळात मोठ्या तरतुदी केल्या जात नसत. पण मोदी सरकार हे पायंडा मोडण्यात एक्सपर्ट आहे.
मोदी सरकारने अंतरिम बजेटमध्ये याआधी अनेक मोठ्या-मोठ्या घोषणा केल्या आहेत एवढेच नाही तर नवीन योजनांसाठी आवश्यक तरतूद देखील अंतरिम बजेटमध्ये केली आहे.
दरम्यान या बजेटमध्ये देखील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करेल आणि त्यासाठीची तरतूद देखील होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवू शकते.
असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 वरून थेट 26,000 पर्यंत वाढू शकतो अशी शक्यता आहे.