Union Budget : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर केला आहे. खरे तर 2024 हे निवडणुकांचे वर्ष आहे. यामुळे या निवडणुकांच्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
आज अंतरिम बजेट सादर झाला आहे आणि जुलै महिन्यात म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर 2024-25 चा अंतिम बजेट सादर होणार आहे.
म्हणजेच निवडणुकांच्या वर्षात वर्तमान सरकार अंतरिम बजेट सादर करते आणि नव्याने सत्तेत येणारी सरकार नवीन बजेट सादर करत असते. यानुसार आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
खरंतर अंतरिम बजेट सादर झाल्यानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असल्याने या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील अशा आशा होत्या.
त्यानुसार केंद्र शासनाने समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. मात्र तरीही या बजेटकडून जेवढी आशा होती तेवढ्या घोषणा झालेल्या नाहीत.
या बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे, फिटमेंट फॅक्टर वाढवणे, 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देणे याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे बोलले जात होते. मात्र सरकारने या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष दिलेले नाही.
याशिवाय पीएम किसान योजनेत बदल होईल आणि पीएम किसान योजनेची रक्कम 9000 पर्यंत वाढवली जाईल तसेच पीएम किसान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची रक्कम दिली जाईल असे वाटत होते.
मात्र पीएम किसान योजनेत देखील बदल करण्यात आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. परंतु आज आशा सेविकांसाठी आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र शासनाने एक मोठी घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशा सेविकांना आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार अशी मोठी घोषणा केली आहे. यामुळे देशातील आशा सेविकांना आणि अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.