मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ महाराष्ट्रात ! ‘या’ शहरात तयार होतंय दुसर आंतरराष्ट्रीय विमानतळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Airport : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. विकासाची अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेली आहेत. या प्रकल्पांमुळे राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होत आहे. मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांची विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास आली आहेत.

विशेष म्हणजे विमान वाहतूक सुधारण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील विविध शहरांमध्ये नवीन विमानतळ तयार होत आहेत. राजधानी मुंबईत देखील नवीन विमानतळ विकसित केले जात आहे.

हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार असून याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई हे देशातील एकमात्र असे शहर असेल जिथे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ राहतील. यामुळे या प्रकल्पाकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष आहे.

हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन देखील प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत आज आपण नवी मुंबई येथे तयार होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

सध्या मुंबईमध्ये ज्या महत्वकांशी प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखील समावेश होतो. या विमानतळाला डी. बी. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून ओळखले जाणार आहे. हे विमानतळ 16,700 कोटी रुपयांचा खर्च करून विकसित केले जाणार आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे विमानतळ बांधले जात आहे. अनेक बाबतीत हे विमानतळ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहे.

या नवी मुंबईमध्ये विकसित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी राहणार आहे. अशी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी राहणारे हे देशातील पहिले विमानतळ असेल.

ही देशातील सर्वात मोठी सामान्य विमान वाहतूक सुविधा असेल. हेलिपोर्ट ऑपरेशन्स व्यतिरिक्त, 67 हून अधिक सामान्य विमान वाहतूक विमाने ठेवण्याची सुविधा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेल.

हे विमानतळ राष्ट्रीय फूल कमळाच्या आकारासारखे डिझाईन केले जाणार आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यानंतर मुंबई हे देशातील पहिले असे शहर राहणार आहे, जिथे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील.

या विमानतळावर फक्त इलेक्ट्रिक व्हेईकल वापरले जाणार आहेत. सुरुवातीला वार्षिक दोन कोटी एवढी या विमानतळाची प्रवासी क्षमता राहणार आहे मात्र नंतर या विमानतळाची प्रवासी क्षमता नऊ कोटीवर पोहोचणार आहे.

Leave a Comment