सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ‘ही’ सरकारी बँक कमी व्याजदरात देते पर्सनल लोन, किती व्याजदर लागते ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : आज केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर केला आहे. खरेतर या बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून गरम होत्या. मात्र प्रत्यक्षात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीच मोठी घोषणा केली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये या अंतरिम बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे, फिटमेंट फॅक्टर वाढवणे, 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देणे यांसारख्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले जात होते.

मात्र सरकारने या तिन्हीही मागण्यांवर कोणताच निर्णय घेतलेला नाही. याबाबत सरकारने साधा उल्लेख देखील केला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

मात्र आजची ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील अशा एका बड्या बँकेची माहिती जाणून घेणार आहोत जी सरकारी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. आम्ही ज्या बँकेबाबत बोलत आहोत ती आहे बँक ऑफ बडोदा.

बँक ऑफ बडोदाचे पर्सनल लोनसाठी व्याजदर

अर्थतज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा आपल्याकडे पैशांसाठी कोणताच पर्याय उपलब्ध नसतो तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढले पाहिजे. वैयक्तिक कर्ज हे खूपच आवश्यकता असेल तेव्हाच काढावे. कारण की, वैयक्तिक कर्जासाठी बँकांच्या माध्यमातून अधिकचे व्याजदर आकारले जाते.

दरम्यान बँक ऑफ बडोदा बाबत बोलायचं झालं तर या बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी 11.40 टक्क्यांपासून ते 18.75 टक्क्यांपर्यंतची व्याजदर आकारले जात आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमी व्याजदरात बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे व्याजदर

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, BOB कडून सरकारी कर्मचाऱ्यांना 11 टक्के ते 11.90% या व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे.

मात्र हा व्याजदर फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू राहणार आहे. इतर कर्मचाऱ्यांना तसेच व्यावसायिकांना या दरात वैयक्तिक कर्ज मिळणार नाही.

खाजगी कर्मचाऱ्यांसाठीचे व्याजदर

व्यावसायिक किंवा मग कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बीओबी बँकेच्या माध्यमातून 12.80% ते 16.75% या व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे.

हे वैयक्तिक कर्ज सिबिल स्कोरच्या आधारावर मिळणार आहे. म्हणजेच सिबिल स्कोर जर चांगला असेल तर कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळेल नाहीतर मग अधिकचा व्याजदर आकारला जाणार आहे.

Leave a Comment