Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाई स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे आता मुंबईला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय रेल्वे लवकरच मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान तिसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बांधलेल्या या नवीन ट्रेनने नुकतीच 15,000 किमीची कठोर चाचणी पूर्ण केली आहे जेणेकरून ती सर्वोच्च मानकांची पूर्तता करेल.
खरे तर सध्या स्थितीला मुंबई ते अहमदाबाद दरम्यान एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. याशिवाय मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणारी ट्रेन देखील अहमदाबाद वरून सुरु आहे. म्हणजेच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी ही तिसरी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे.
ही नव्याने लॉन्च होणारी गाडी आधीच्या तुलनेत अधिक जलद आपला प्रवास पूर्ण करणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. नवीन वंदे भारत ट्रेन केवळ 140 सेकंदात 160 किमी प्रतितास वेग गाठणार आहे.
यामुळे प्रवासाचा वेळ मागील मॉडेलच्या तुलनेत सुमारे 45 मिनिटांनी कमी होईल. म्हणजे ही नव्याने लॉन्च होणारे गाडी मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास 5 तास 25 मिनिटांत प्रवास पूर्ण करू शकणार आहे.
नवीन ट्रेन रविवार वगळून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे 11:35 वाजता पोहोचणार आहे.
तसेच ही गाडी मुंबई सेंट्रलवरून 15:55 वाजता सुटेल आणि रात्री 21:25 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.