Vande Bharat Express : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांचे पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळू लागले आहेत. अनेकांनी उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी ट्रिपचे आयोजन केलेले आहे. तसेच काही लोक लवकरच ट्रिपचे आयोजन करणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्याला हजेरी लावतात.
गोवा हे पर्यटकांमधील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. येथे बारा महिने गर्दी असते मात्र उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.दरम्यान जर तुम्हीही गोव्याला जाण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.
जर तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जाणार असाल अन यासाठी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याची तुमची तयारी असेल तर आज आपण वंदे भारत एक्सप्रेसने गोव्याला जाण्यासाठी किती रुपयांचे तिकीट काढावे लागते, याचे वेळापत्रक कसे आहे, याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. या हाय स्पीड ट्रेनमुळे गोव्याला जाणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत आणखी वाढली आहे.
या गाडीने जलद गतीने गोव्याला जाता येणे शक्य झाले असल्याने पर्यटकांना या गाडीचा मोठा फायदा होत आहे. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवली जात आहे. ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस चालवली जाते.
सी एस एम टी येथून वंदे भारत एक्सप्रेस मध्ये बसल्यानंतर ही गाडी सात तास आणि 45 मिनिटांनी मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडते. सीएसएमटी येथून ही गाडी 05:45 मिनिटांनी निघते आणि मडगावला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पोहोचते.
या ट्रेनच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी गोव्यातील मडगावहून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी निघते आणि CSMT ला रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी पोहोचते. या वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे नऊ डबे आहेत.
तिकीट दर कसे आहेत?
गोवा ट्रिप काढणाऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी कितीचे तिकीट काढावे लागते. त्यामुळे आता आपण या वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर पाहणार आहोत.
सीएसएमटी ते मडगाव : चेअर कार 1595 रुपये, एक्झिक्यूटिव्ह चेअर 3115 रुपये
दादर ते मडगाव : चेअर कार 1595 रुपये, एक्झिक्यूटिव्ह चेअर 3115 रुपये
ठाणे ते मडगाव : चेअर कार 1570, एक्झिक्युटिव्ह चेअर 3045
कल्याण ते मडगाव : चेअर कार 1595, एक्झिक्यूटिव्ह चेअर 3115 रुपये
खेड ते मडगाव : चेअर कार 1185 रुपये, एक्झिक्युटिव्ह चेअर 2265 रुपये
रत्नागिरी ते मडगाव : चेअर कार 995, एक्झिक्युटिव्ह चेअर 1790 रुपये
थिविम ते मडगाव : चेअर कार 435 रुपये, एक्झिक्यूटिव्ह चेअर 820 रुपये