Vande Bharat Express : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. ही गाडी 2019 मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गांवर चालवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
सद्यस्थितीला वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
विशेष म्हणजे आपल्या राज्याला भविष्यात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असा दावा होत आहे. अशातच मात्र वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा दुप्पट वेग असणाऱ्या ट्रेन संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हो, बरोबर वाचताय तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा दुप्पट वेग असणारी ट्रेन अर्थातच बुलेट ट्रेन बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस चा ताशी वेग 160 किलोमीटर आहे दुसरीकडे बुलेट ट्रेनचा ताशी वेग हा 320 किलोमीटर एवढा राहणार आहे.
खरेतर भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्र अन गुजरातदरम्यान विकसित होत आहे. या प्रकल्पा अंतर्गत राजधानी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
हा प्रकल्प देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे, तर 5000 कोटी महाराष्ट्र शासन आणि 5000 कोटी गुजरात शासन देणार आहे.
तसेच उर्वरित रक्कम ही जापान कडून घेतली जाणार आहे. यावर फक्त 0.1 टक्के एवढा व्याजदर आकारला जाणार आहे. अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेन मार्गावर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई ही महत्त्वाची स्थानके विकसित होणार आहेत.
याचे काम 2021 मध्ये सुरू झाले होते आणि आता येत्या दोन वर्षांनी अर्थातच 2026 पर्यंत बुलेट ट्रेन रुळावर धावण्याची शक्यता आहे. 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होणार असा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.
विशेष म्हणजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट दर किती राहणार ? याबाबत देखील माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मधल्या प्रमाणे बुलेट ट्रेनचे तिकीट हे विमान तिकीटापेक्षा कमी राहणार आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट हे तीन हजार रुपये एवढे असू शकते. याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही परंतु विमानाच्या तिकिटापेक्षा बुलेट ट्रेनचे तिकीट कमी राहणार एवढे नक्की.