……तर मान्सूनच आगमन लांबणार ! जूनमध्ये येणारा पाऊस पडणार लांबणीवर, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. सूर्यदेव महाराष्ट्रावर चांगलेच कोपले आहेत. तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे. दुसरीकडे आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ विभागातील वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे. इतरही काही भागात पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पण, यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नसत्याचे म्हटले जात आहे. कारण की शेतकऱ्यांची शेतीतील बहुतांशी कामे आता पूर्ण झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील शेती पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे त्यांना मात्र याचा फटका बसू शकतो.

तथापि, याचा फारसा विपरीत परिणाम सध्या तरी पाहायला मिळणार नसल्याचा दावा होतोय. मात्र सध्याचा वादळी पाऊस आणि गारपीट भविष्यात शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. खरे तर आता मान्सून आगमनाला अवघ्या दोन महिन्यांचा काळ बाकी आहे. सात जूनला मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते.

सर्वप्रथम महाराष्ट्रात मान्सून तळकोकणात दाखल होतो आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. यानुसार सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी फक्त दोन महिन्यांचा काळ बाकी असून या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांनी आता आगामी खरीप हंगामासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

अशातच मात्र सध्या कोसळत असलेला वादळी पाऊस आणि गारपीट मान्सूनचे आगमन लांबवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर वादळी पाऊस आणि अती गारपीट झाली, पावसाचे प्रमाण अधिक राहिले तर जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या स्थितीला शेतकऱ्यांची शेतीतली बरीच कामे उरकली आहेत. यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फारसा विपरीत परिणाम शेतकऱ्यांना पाहायला मिळणार नाही.

मात्र भविष्यात या अति पावसामुळे आणि गारपिटीमुळे मान्सूनचे आगमना लांबू शकते असा अंदाज आहे. निश्चितच जर असे घडले तर शेतकऱ्यांना भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो.

आज कुठं पाऊस होणार

आज राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यात गारपीट होणार असा अंदाज आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात सुद्धा गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला जातोय.

Leave a Comment