Vande Bharat Express : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विपक्ष मधील नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान पूर्ण होणार आहे.
4 जून 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला आयोजित एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावू शकते. खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असा दावा केला जात आहे. मात्र या ट्रेनला अजूनही मुहूर्त लाभलेला नाही.
परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या देशातील 51 मार्गांवर ही गाडी सुरू असून यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
म्हणजे भविष्यात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर राज्यातील वंदे भारतची संख्या 9 वर पोहोचणार आहे. अशातच आता बिहारला देखील नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील मुजफ्फरपुर आणि जयनगर या दोन स्टेशनंवरुन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते. 15 जून नंतर कधीही या वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो.
याबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच निर्गमित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या या रेल्वे मार्गावरील ट्रॅकचे अपग्रेडेशनचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वंदे भारत व्यतिरिक्त अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील पूमरे म्हणजेच पूर्व मध्य रेल्वे कार्यक्षेत्रातून चालवली जाणार आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुझफ्फरपूर ते दिल्ली, जयनगर ते दिल्ली व्हाया मुझफ्फरपूर या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची तयारी सुरू आहे.