Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. आजही या मार्गावरील वंदे भारत ट्रेन सुसाट धावत असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे.
देशातील पहिली वंदे भारत सुसाट धावल्यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या देशभरातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे.
विशेष म्हणजे या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. विशेष बाब अशी की मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्लॅन आहे.
याचे संभाव्य वेळापत्रक देखील समोर आले आहे. सध्या स्थितीला मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास बस किंवा इतर अन्य खाजगी वाहनांनी करायचे म्हटले तर प्रवाशांना तब्बल 9 ते 12 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.
पण या मार्गावर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाले तर हा प्रवास फक्त सात तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळणार आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र कोल्हापूर नगरीत हजेरी लावतात. तसेच कोल्हापूर येथून देखील दैनंदिन कामानिमित्ताने अनेक प्रवासी मुंबईला जातात.
यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली पाहिजे अशी मागणी आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे.
या एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रक देखील समोर आले आहे. या संभाव्य वेळापत्रकात कोल्हापूर येथून पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी ही एक्स्प्रेस गाडी सुटणार व सीएसटीला १२ वाजून ५६ मिनिटांनी पोहोचणार, असे नमूद आहे.
पण, संभाव्य वेळापत्रक जरी समोर आलेले असेल तरी देखील ही एक्स्प्रेस नेमकी कधी सुरू होणार, याची संभाव्य तारीख अजून समोर येऊ शकलेली नाही. यामुळे ही एक्सप्रेस सुरू होणार की नाही हा मोठा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.