Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला 2019 पासून म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या प्रकारातील एकूण 5 ट्रेनची भेट मिळालेली आहे.
राजधानी मुंबई वरून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या 5 मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे.
या ट्रेनला संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखले जात आहे. या ट्रेनची क्रेज संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहे. प्रवाशांमध्ये ही गाडी खूपच लोकप्रिय बनलेली आहे.
यामुळे वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू व्हावी अशी मागणी आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
प्रवासी देखील रेल्वे विभागाकडे याबाबत पाठपुरावा करत आहेत. अशातच आता उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे येथील सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
कारण की लवकरच उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानीला आणखी नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळेल अशी शक्यता आहे.
खरे तर नागपूर आणि पुण्यात सध्या ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे. मात्र पुण्यातून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणारी गाडी पुणेमार्गे धावते.
यामुळे पुण्याहून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी आहे. दरम्यान नागपूर, पुणे आणि सोलापूरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर विकास मंचाने सोलापूर ते नागपूर सोलापूर ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत नुकतीच बैठक घेतली.
मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे यावेळी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी या तीन मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. यामुळे आता मंचाची ही मागणी पूर्ण होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.