Vande Bharat Express : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसविषयी मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम धावली होती.
सर्व्यात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आता 30 डिसेंबर 2023 ला देशातील 6 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश आहे.
मुंबई ते जालना या मार्गावर 30 डिसेंबरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर मुंबई ते जालना असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर दैनंदिन कामानिमित्त जालना सर्व संपूर्ण मराठवाड्यातून हजारो नागरिक मुंबईला येत असतात. यामुळे या मार्गावर वंदे भारत चालवली पाहिजे अशी मागणी होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई ते जालना दरम्यान ही गाडी सुरू होणार असून ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे जाणवली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामुळे छत्रपती संभाजीनगर सहित जालना आणि मराठवाड्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. मुंबई-जालना दरम्यान ही गाडी सुरू झाल्यानंतर मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. नवीन वर्षात ही गाडी सुरू होणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी ही माहिती दिली आहे.
खरंतर कोल्हापूर येथून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईला जात असतात. शिवाय मुंबईतून कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील लाखोंच्या संख्येने नागरिक येतात.
अशा परिस्थितीत या मार्गावर ही गाडी सुरू होणे आवश्यक आहे. दरम्यान आता या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आहे.