खुशखबर ! देशातील ‘या’ 5 महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे साधारण ट्रेन, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, कोणत्या मार्गावर सुरू होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Sadharan Express Train : 2019 मध्ये केंद्र शासनाने वंदे भारत ट्रेन ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी रेल्वेच्या ताफ्यात सामील झाली आणि रेल्वे प्रवाशांच्या मनात कमी दिवसातच घर करून गेली आहे. ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये सुपरहिट ठरली आहे. या गाडीला खूप प्रेम दिले जात आहे.

आतापर्यंत ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर सुरू झाली आहे. आगामी काही दिवसात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. यामुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. अशातच आता रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

खरंतर वंदे भारत ट्रेन ही देशातील सर्वाधिक वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगले प्रेम दाखवले आहे. परंतु वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दराबाबत प्रवाशांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळत आहे. ही गाडी फक्त श्रीमंत लोकांसाठी सुरू झाले आहे असा आरोप रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून केला जात आहे.

या गाडीचे तिकीट दर अधिक असल्याने सर्वसामान्यांना या गाडीचा प्रवास परवडत नाही असा आरोप केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन सुरू केली जाणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही एक एसी ट्रेन आहे तर वंदे भारत साधारण ट्रेन ही एक नॉन एसी गाडी राहणार आहे. विशेष म्हणजे वंदे साधारण ट्रेन बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट देखील समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील पाच महत्त्वाच्या मार्गावर लवकरच वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने हे पाच मार्ग आता अंतिम केले आहेत. वंदे साधारण ट्रेनची विशेषता म्हणजे या ट्रेनचे तिकीट दर हे वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा खूपच कमी राहणार आहेत. या नव्या ट्रेनमध्ये सर्व डब्बे सेकंड क्लासचे राहणार आहेत. दरम्यान, आता आपण भारतीय रेल्वेने कोणत्या पाच मार्गावर वंदे साधारण ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

कोणत्या मार्गावर धावणार वंदे साधारण ट्रेन ?

मिळालेल्या माहितीनुसार, पटना ते नवी दिल्ली, हावडा ते नवी दिल्ली, हैदराबाद ते नवी दिल्ली, मुंबई ते नवी दिल्ली आणि एनारकुलम ते गुवाहाटी या पाच मार्गावर वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार आहे. म्हणजेच वंदे साधारण ट्रेनची आपल्या महाराष्ट्राला देखील भेट मिळणार आहे. राजधानी मुंबई ते राजधानी दिल्ली दरम्यान वंदे साधारण ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे दोन्ही राजधानीच्या शहरातील प्रवास गतिमान होणार आहे.

Leave a Comment