Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानास्पद अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावणार आहे. निश्चितच ही महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट राहणार असून ज्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दाखवला आहे तसाच प्रतिसाद या हाय स्पीड ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
2019 मध्ये केंद्र शासनाने वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू केली. ही ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदा चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा मिळाला.
सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. देशातील 41 महत्त्वाच्या अप आणि डाऊन मार्गांवर ही गाडी सुरू आहे. म्हणजेच महाराष्ट्रात सध्या 82 वंदे भारत गाड्या सुरू आहेत.
या गाड्यांना रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व प्रतिसाद दाखवला जात आहे. यामुळे गदगद झालेल्या भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आता या गाडीचे स्लीपर व्हर्जन लवकरच लाँच केले जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचा प्रोटोटाइप तयार झाला आहे आणि एप्रिलमध्ये याची ट्रायल रन सुरू होऊ शकते. सर्वप्रथम ही गाडी दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावर चालवली जाईल अशी बातमी समोर आली आहे.
यामध्ये एसी आणि नॉन एसी डबे असतील. अर्थातच पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना जलद गतीने दिल्लीला पोहोचता येईल अशी अशा व्यक्त होत आहे.
या प्रकारच्या वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवाशांना आता झोपून प्रवास करता येणार आहे. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी अलीकडेच सांगितले होते की, या आर्थिक वर्षात वंदेची स्लीपर आवृत्ती लॉन्च केली जाईल.
स्लीपर वंदे भारत एक संघ बनवत आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या TMH समूहाचा समावेश आहे. या संघाने 200 पैकी 120 स्लीपर वंदे भारत चालवण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती.
उर्वरित 80 गाड्या टिटागड वॅगन्स आणि भेल यांच्या संघाद्वारे पुरवल्या जातील. आरव्हीएनएलचे जीएम (मेकॅनिकल) आलोक कुमार मिश्रा यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल.
यात 11 एसी 3, चार एसी 2 आणि एक एसी 1 कोच असे 16 डबे असतील. ते म्हणाले की, कोचची संख्या 20 किंवा 24 पर्यंत वाढवता येऊ शकते.