थाटात होऊ द्या शुभमंगल सावधान ! आता लग्नासाठी मिळणार लाखोंचे कर्ज, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marriage Loan : सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरू आहे. ज्यांची रेशीमगाठ बांधली गेली आहे अशा लग्नाळूचे आता धुमधडाक्यात लग्न-सोहळे पार पडत आहेत. भारतात लग्न हा एक संस्कार समजला जातो. लग्न ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात एकदाच घडत असते.

त्यामुळे प्रत्येकालाच आपले लग्न थाटात झाले पाहिजे असे वाटते. मात्र वाढती महागाई पाहता थाटात लग्न काढायची असेल तर रोकड देखील अधिक खर्च करावी लागते.

यामुळे लग्नासाठी पैशांची जमवाजमव करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आता शुभमंगल सावधान अगदी थाटात पार पाडता येणार आहे.

कारण की, तुमच्या लग्नासाठी किंवा तुमच्या परिवारातील सदस्याच्या लग्नासाठी पैशांची अडचण असेल तर तुम्हाला आता कर्ज देखील मिळू शकणार आहे.

खरे तर आम्ही पीएफ लोन बाबत बोलत आहोत. जी नोकरदार मंडळी असेल त्यांना आता लग्नासाठी पीएफ लोन मिळू शकणार आहे.

पण, लग्नासाठी पीएफ लोन घेताना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. दरम्यान आज आपण याच पीएफ लोन बाबत अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीएफ कर्ज कसे घ्यावे

EPFO खात्याच्या रकमेवर कर्ज घेणे हा पैसे काढण्यापेक्षा चांगला पर्याय आहे. काही अटी असल्या तरी PF कर्ज सहज घेता येते. कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला इतर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म 31 सबमिट करावा लागेल.

यासाठी तुम्ही ईपीएफओ पोर्टलवर हा फॉर्म भरून कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी कर्मचाऱ्यांना पोर्टलवर त्यांचे UAN लॉगिन वापरावे लागणार आहे.

या नियमांचे पालन करावे लागणार

EPFO ​​ने कर्ज घेण्यासाठी काही नियम लागू केले आहेत जेणेकरुन व्यक्तींना आंशिक पैसे काढण्याचा किंवा ॲडव्हान्सचा फायदा पुन्हा पुन्हा घेता येणार नाही. या नियमांची अंमलबजावणी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे PF खातेधारकाकडे त्याच्या निवृत्तीसाठी पैसे शिल्लक असायला हवेत.

मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्हाला लग्नासाठी आगाऊ रक्कम घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या EPF मधून संपूर्ण रकमेच्या 50% पर्यंत रक्कम काढता येऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या आणि भावंडांच्या लग्नासाठी पैसे काढू शकता. पण यासाठी EPFO सदस्याने किमान 7 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी.

Leave a Comment