Vande Bharat Sleeper Train : भारतात वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या गाडीने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. दरम्यान या गाडीची लोकप्रियता पाहता आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे.
ही गाडी लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी एक्सप्रेस पेक्षा अधिक गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाईप मार्च अखेरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे प्रोटोटाइप तयार झाले की लगेचच याचे परीक्षण केले जाणार आहे. एप्रिल 2024 मध्ये याचे परीक्षण होणार अशी शक्यता आहे.
तसेच ही गाडी 2025 अखेरपर्यंत रुळावर धावणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही आपल्या महाराष्ट्राला मिळण्याची दाट शक्यता आहे.
दिल्ली ते मुंबई या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. त्यामुळे जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर प्रवासाच्या कालावधीत जवळपास दोन तासांची बचत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे. तथापि, रेल्वेच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. म्हणून ही गाडी सर्वप्रथम कोणत्या मार्गावर चालवली जाणार हे ठामपणे सांगता येणार नाही. द
रम्यान लाईव्ह हिंदुस्तान या वृत्तसंस्थेला एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही दिल्ली ते मुंबई किंवा दिल्ली ते हावडा यापैकी कोणत्यातरी एका मार्गावर सुरू होऊ शकते.
यामुळे ही गाडी मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुरू होणार की दिल्ली ते हावडा या मार्गावर सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.